विद्यार्थ्यांच्या वाचन  क्षमता अभिवृद्धीसाठी आनंददायी शिक्षण पद्धतीच्या परिणामांचा अभ्यास

Authors

  • डॉ. अमोल शिवाजी चव्हाण, विमल भिमराव खाडे

Abstract

 

 

 

वाचन क्षमता ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीतील पायाभूत क्षमता म्हणून स्वीकारण्यात आलेली आहे.  विद्यार्थ्यांच्या वाचनातील आकलन, वाचन वेग आणि वाचनातील आत्मविश्वास हे घटक विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेच्या सद्यस्थितीतील अडचणींची कारणे ओळखून योग्य पद्धतीने मूल्यमापन आवश्यक असते. अनेक विद्यार्थ्यांची वाचनातील रुची कमी होऊन अध्ययन प्रक्रिया मंदावल्याची देखील उदाहरणे आढळून आलेली आहेत. विद्यार्थी बऱ्याचदा अध्ययन प्रक्रियेत अपेक्षित सहभाग दर्शवित नाहीत., तेव्हा आनंददायी शिक्षण तंत्राचा समावेश करण्यात आला. ज्यामुळे विद्यार्थी अध्ययन प्रक्रियेमध्ये सक्रियपणे सहभागी झाले. सदर संशोधनात विद्यार्थ्यांची वाचन क्षमता, वाचन वेग आणि वाचनातील आत्मविश्वास या पैलूंचे संशोधन करण्यात आले. संशोधनाचे निष्कर्ष दर्शवतात की आनंददायी शिक्षण पद्धतींच्या अंमलबजावणीनंतर विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेत वाढ होऊन सकारात्मक अभिवृध्दी झाली. विद्यार्थ्यांची अध्ययनात रुची वाढली. तसेच अध्ययन प्रक्रिया अधिक सुगम व अर्थपूर्ण ठरली, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रक्रियेत सहभाग वाढला.

Downloads

Published

2006-2026

Issue

Section

Articles